माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले तर चौकशीसाठी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. सीबीआय कोठडी वाढवण्यास विशेष न्यायालयाने आज नकार दिला.
देशमुख यांच्यावर मनी लॉडरिंग आणि 100 कोटींच्या वसुलीप्रकरणाचे आरोप आहेत. मनी लाँडरिंगच्या आणि शंभर कोटी रुपयांच्या कथित खंडणी वसुली प्रकरणात ईडी आणि सीबीआय तपास करत आहेत. भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ही कोठडी 29 एप्रिलपर्यंत म्हणजे एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत तुरुंगातच असणार. या प्रकरणातील इतर आरोपींनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
देशमुख सध्या सीबीआय कोठडीत होते परंतु सीबीआयने रिमांडसाठी दिलेली कारणे असमाधानकारक असल्याने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. देशमुखांसह बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, कुंदन शिंदे आणि संजीव पांडे यांच्या न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले. हा निर्णय सीबीआयला धक्का देणारा असून, अनिल देशमुख यांना काही अंशी दिलासा देणारी आहे असे मानले जात आहे .
मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर देशमुखांनी हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली असून त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. देशमुख यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांचे वकील अनिकेत निकम जामीनासाठी प्रयत्नात करणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम