अखेर देवळा शिवसेनेत खांदे पालट ; बापू जाधव तालुका प्रमुख पदी विराजमान

0
3

देवळा : राज्यात सत्तेत असलेल्या सेनेला तालुक्यात घरघर लागली होती, शिवसैनिकांना तालुक्यात मवाळ तालुका प्रमुख लाभल्याने सेनेला नवसंजीवनी प्राप्त होत नव्हती, यामुळे तालुकाप्रमुख बदलाची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.

नगरपंचायत निवडणुक असो वा अन्य काही असो यात सेनेने कुठलेही ठोस पाऊले उचलली नसल्याने तालुक्यातील सेनेत एकप्रकारे मरगळ आलेली होती. नवनिर्वाचित शिवसेना देवळा तालुका प्रमुख पदी बापू जाधव यांची निवड झाल्याने सैनिकांनी जल्लोष केला आहे. त्यांच्या रूपाने सर्वसामान्य शिवसैनिक तालुका अध्यक्ष झाला आहे. आता त्यांच्यापुढे तालुक्यांतील शिवसेना कात टाकते का हे बघन महत्त्वाचे आहे.

देवळा शिवसेना मजबूत उभारी घेवून लढा देते की पुन्हा एकदा ‘ऑल इज वेल ‘ ची भूमिका स्वीकारते हे बघणे महत्वाचे असणार आहे. तालुक्यात सैनिकांना आता तरी निष्ठा बघायला मिळणार का याची उत्सुकता आहे. कडवट सैनिकांना आहे.जाधव यांची निवड शिवसेना भवनातून करण्यात आली. या निवडीने संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमख, व अन्य पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here