Skip to content

रमजानपुरा भागातील 34 वर्षीय तरुण बेपत्ता


– योगेश ठाकरे
मालेगाव : रमजानपुरा भागातील 34 वर्षीय तरुण बेपत्ता झाला असून पोलीस स्टेशन मध्ये खबर दाखल करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की सय्यद अफाक्र अली आसिम अली हे पत्नी नसीम अफाक्र सय्यद तसेच मुलगा साहिल सय्यद अली सह गेट नं 137 प्लॉट नं 27 रमजानपुरा ,मालेगाव येथे एकत्रित कुटुंबात राहत असुन सय्यद हे हॉटेल मध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत असे ,सय्यद हे उजव्या पायाने अपंग आहेत.

दिनांक 19/04/2022 रोजी सकाळी ११: 00 वाजेच्या सुमारास सय्यद हे नेहमीप्रमाणे हॉटेल कामासाठी जातो असे पत्नीस सांगून घरातुन निघून गेले.5-6 दिवसानंतर ही घरी न परतल्याने पत्नीने मालेगाव तसेच बाहेरगावी राहणारे नातेवाइकांशी संपर्क केला असता कोणाकडेही काहीही माहिती मिळत नसल्याने शेवटी 05/05/2022 रोजी बेपत्ता असल्याची पोलिसांना माहिती दिली.

पुढील तपास मा.पोलीस निरीक्षक सो रमजानपुरा पो.स्टे.करत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!