Skip to content

मुल्हेर येथे क्रीडा प्रशिक्षण शिबिर संपन्न


स्वप्निल अहिरे,
सटाणा प्रतिनिधी : नासिक जिल्हा क्रीडा कार्यालय व जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील मुल्हेर येथे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

क्रीडा प्रशिक्षण शिबिर मुल्हेर येथे घेण्यामागचा उद्देश आज बालकांसह युवा पिढी सुद्धा मोबाईल व टी. व्ही च्या माध्यमात जास्त गुरफटले जात आहे. व मैदानावरच्या खेळांचा पूर्णपणे विसर पडला आहे. त्यामुळे या शिबिराचा युवकांना व सर्वांना जास्त फायदा होईल हाच एकमेव शिबिराचा उद्देश आहे. या शिबिरासाठी तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन लाभले. योगा शिकविण्यासाठी नाशिक येथून दिपाली खोडदे, कराटे ट्रेनर प्रशिक्षक भोसले, मुल्हेर येथील क्रीडा प्रशिक्षक चंद्रशेखर पटाडे सर हे स्वतःच परिश्रम घेत आहेत.

दिनांक १८ ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न झालेल्या या क्रीडा मार्गदर्शन शिबिरात प्रत्येक खेळातील तज्ञ क्रीडा शिक्षकांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले आहे. या शिबिराच्या यशस्वितेसाठी जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथील शिक्षक वर्ग, कर्मचारी याबरोबरच मुल्हेर ग्रामपंचायत उपसरपंच मोठाभाऊ जगताप, ज. वि.संचालक अनिल पंडित समन्वयक व सामाजिक कार्यकर्त्या सौ.माया येवला आदींनी परिश्रम घेतले आहेत. दरम्यान अशा प्रकारचे क्रीडा मार्गदर्शन शिबिर प्रत्येक विद्यालयात व महाविद्यालयात घेण्यात येऊन विद्यार्थ्यांना मैदानी खेळा बाबत आवड निर्माण व्हावी या करिता प्रयत्नशील असायला हवे अशी भावना नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापिका श्रीमती सुरेखा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

युवा पिढीला मैदानी खेळांचा विसर पडावयास नको या पार्श्वभूमीवर उन्हाळी क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १८ एप्रिल पासून सुरू असलेल्या या क्रीडा मार्गदर्शन शिबिराचा १ मे महाराष्ट्र दिनी समारोप करण्यात आला. सर्व उपस्थितांना नाश्ता व आईस क्रीम देऊन निरोप समारंभ करण्यात आला. या शिबिरात कबड्डी, खोखो, कुस्ती, जुडो कराटे, हॉलीबॉल,, फुटबॉल,योगासने, किक बॉक्सिंग. बॅडमिंटन, सूर्यनमस्कार, बुद्धिबळ याबरोबरच मनोरंजनाचे खेळही खेळले गेले .यात मुल मुली, व काही गावातील महिला निही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

आजची तरुण पिढी ही मोबाईल आणि टिव्ही च्या आहारी गेल्याने मैदानी तसेच इतर खेळ स्वतःहून मैदानात उतरून खेळण्यास कुणीही तयार होत नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले. जेणेकरून तरुण वर्ग याकडे लक्ष देऊन स्वतःच्या आरोग्यासाठी का होईना व्यायाम करेल.
माया येवला, सामाजिक कार्यकर्त्या तथा महिला रोजगार समिती अध्यक्ष, बागलाण.पुरोगामी पत्रकार संघ


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!