Skip to content

मुंबई गोवा महामार्गावर महाड बस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही


एसटी महामंडळाची महाड बस पनवेलकडून पेणच्या दिशेने जाताना एसटी बसला शुक्रवार आग लागली आहे. कर्नाळा अभयारण्याच्या हद्दीत आल्यानंतर आगीत बस खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ५२ प्रवाशाची सुखरूप बाहेर पडले.

आज सकाळी एसटी महामंडळाची महाड बस कर्नाळा अभयारण्य हद्दीतून जात असताना गाडीच्या बॉनेटमधून धूर येत असल्याचे दिसले. यावेळी एसटी बसला आग लागल्याचे कळताच बस चालकाने कंडक्टरच्या सहाय्याने सांगून 52 प्रवाशांचा जिव वाचवला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांचे सामान व बस पूर्णतः जळून खाक झाली.एम एच 14 बी टी 20 65 आज बसचा क्रमांक आहे.

घटनेची माहिती मिळताच, पनवेल अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून आग विझविण्यात यश आले.या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर काही काळ ट्रॅफिक ठप्प झाल्याने मोठी गर्दी जमली होती. खबरदार यांच्यात सहारे वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!