Skip to content

भविष्यात आढळराव पाटील संसदेत असतील”, संजय राऊत यांचा अमोल कोल्हे यांना इशारा


सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे भविष्यात संसदेत असतील, असे मत खासदार संजय राऊत यांनी शिरुरमध्ये व्यक्त केले.

खासदार संजय राऊत कालपासून पुणे दौऱ्यावर आहे. आज आढळरावांचं होम ग्राऊंड असलेल्या शिरुर-आंबेगावात रावतांनी पत्रकार परिषदेत म्हणाले, आढळराव पाटील यांचं शिवसेनेसाठी मोठ योगदान आहे तर नाव न घेता राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना इशारा दिला. ” शिरुर लोकसभेच्या जागेसाठी आम्ही एकत्रित बसणार. पण एवढं नक्की सांगतो, भविष्यात शिवाजीराव आढळराव पाटील संसदेत असतील”, असं राऊत म्हणाले.

आढळरावांचं शिवसेनेसाठीचं काम मोठं आहे. त्यांच्या पाठीमागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे सध्या शिरुर लोकसभेचे खासदार असलेले राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे यांचं काय होणार? असा प्रश्न राऊतांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

येणाऱ्या काळातील सगळ्या निवडणुका एकत्रित लढवणार असल्याचंही राऊत म्हणत आहेत. आढळरावांनी गेल्या अनेक वर्षांपासून सेनेसाठी केलेलं काम, त्यांच्या कामाची इतिहासात नोंद आहे. कुणी काहीही म्हणत असतील, पण भविष्यात शिवाजीराव आढळराव पाटील हे संसदेत असतील’, असा टोला देखील यावेळी त्यांनी लगावला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!