Skip to content

बोहर्डी येथील तरूणाकडे आढळल्या दोन तलवारी, आरोपीला ठोकल्या पोलिसांनी बेड्या


भुसावळ तालुक्यातील बोहर्डी येथील तरुणाकडे दोन तलवारी सापडला आहे. परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. वरणगाव पोलिसांनी तलवार जप्त केल्या आहेत. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळ बोहर्डी गावातील तरुणाकडे बेकायदेशीररीत्या दोन तलवारी असल्याची गोपनिय माहिती वरणगाव पोलिस निरीक्षक आशीष अडसुळ यांना मिळाली. जितेंद्र उत्तम कोळी वय 33, बोहर्डी, ता.भुसावळ असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांना 11 रोजी कर्मचार्‍यांना कारवाईचे आदेश दिले.

वरणगाव पोलिस अधिकाऱ्यांनी सापळा रचून बोहर्डी येथे आरोपीच्या घराची झडती घेत मक्याच्या चार्‍याच्या ढिगातून दोन तलवार जप्त करण्यात आला आहे. यावेळी जितेंद्र कोळी याला अटक करण्यात आली. प्रकरणी पराग दुसाणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी जितेंद्र कोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वरणगाव पोलिस निरीक्षक आशीष अडसुळ यांच्यासह कॉन्स्टेबल पराग राजेंद्र दुसाणे, पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, एएसआय नरसिंग चव्हाण, चालक ईस्माईल शेख आदींनी तिला अटक करण्याकरता सहाय्य केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!