Skip to content

पाकिस्तानातील कराची येथे घडला मोठा विस्फोट ,३ मृत्यू १३ अधिक जखमी


पाकिस्तानमधील कराची येथे काल रात्री बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, या बॉम्बस्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिघांचा मृत्यू झाला असून तेराहून अधिक जखमी झाले आहे.

हा बॉम्बस्फोट एवढा जोरदार होता की त्याचा आवाज आणि हादरा बसल्याने आजूबाजूला वाहने देखील उद्ध्वस्त झाली आहे. कराचीमधील बाजारपेठेत प्रचंड गोंधळ असतानाच स्फोट झाला असून तिघांचा मृत्यू झाला, जखमींची संख्या तेराहून अधिक आहे.

या बॉम्बस्फोटात सुमारे दोन किलो स्फोटके आणि सुमारे अर्धा किलो बॉल बेअरिंगचा वापर करण्यात आला होता. कचराकुंडीच्या शेजारी उभ्या असलेल्या एका सायकलमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला. हा स्फोट टायमरने करण्यात आला.परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

शहराचे केंद्रत स्फोट घडवून आणला आहे. स्फोटाकाचा विस्फोट इतका भयानक होता की आजूबाजूच्या हॉटेल आणि घरांच्या काचा फुटल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!