नवी मुंबईकरांसाठी बातमी ! मानखुर्दहून पनवेल दिशेने जाणाऱ्या रेल्वेची वाहतूक विस्कळीत

0
1

मुंबईकरांची लाईफलाईन असणारी लोकल रेल्वेच्या मार्गावर नवी मुंबई येथे तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. पहाटेच्या सुमारास वाहतूक खोळंबली होती. लोकलच्या हार्बर रेल्वेमार्गावरील वाशी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत पहाटे बिघाड झाला. यामुळे मानखुर्दहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील वाहतुकीवर खोळंबली आहे. ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे आणि वाशी दरम्यान गाड्या धावत नसल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.

हार्बर आणि ट्रान्सहार्बर लाईनवर रेल्वे मार्गावर पनवेल ते सीएसएमटी आणि गोरेगाव या अप हार्बर मार्गावरील गाड्या सुरळीतपणे धावत आहेत. त्याचप्रमाणे ठाणे ते नेरुळ आणि पनवेल ते ठाणे मार्गावरील गाड्या धावत आहेत. बिघाड झालेल्या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. वाहतूक देखील उशिरा होत असल्याने नवी मुंबईतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना पहाटेपासूनच याचा त्रास सहन करावा लागत आहे.

हार्बर मार्गावर हळूहळू सुरू झाल्याचे रेल्वेच्या वतीने आयोजित केले आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी दरम्यान वाहतूक अद्याप सुरु झालेली नाही. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते नेरुळ आणि पनवेल ते ठाणे दरम्यान गाड्या सुरु झाल्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here