दुकानांच्या पाट्या मराठीत केल्या नाहीत तर होणार कारवाई , सुभाष देसाईंनी केली मोठी घोषणा

0
1

दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत दुकानांच्या पाट्या बदलल्या नाहीत तर कारवाई केली जाईल असा इशारा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिला.

मराठी पाट्या व मराठी विषय अनिवार्य करण्याच्या संदर्भात सुभाष देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठीत पाट्या लावण्याच्या नियमांची अंमलबजावणी महापालिका व नगरपालिकांवर सोपवण्यात आली आहे. मराठी पाट्या लावण्यासाठी दुकानदारांना वेळ देण्यात आली आहे, पूर्वी स्पष्ट नियम नसल्याने दुकानदार पळवाटा काढत होते. असेही सुभाष देसाई म्हणाले.

मराठी पाट्या व शाळांतील सक्तीचे मराठी याप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठीचा वापर प्रामुख्याने असला पाहिजे यासाठीही मंडळ सतर्क राहून संपर्क मोहीम उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी दुकाने-आस्थापनांच्या पाटी-बोर्डाच्या आकारापैकी पन्नास टक्के जागेत मराठी भाषेत नाव प्राधान्याने लिहावे लागेल. मग उर्वरीत जागेत इतर भाषेचा वापर करता येईल. अन्यथा कारवाई होणार आहे.

इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांना मराठी विषय अनिवार्यपणे शिकविण्यासाठीसुध्दा अधिनियम मंजूर झाला आहे. शाळा चालकांना त्यांच्या शाळेत मराठी विषय शिकविण्याची व्यवस्था करण्याचा आग्रह करण्यासाठी अनेक मराठी मंडळे व संस्थांनी पुढाकार घेतला आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here