विष्णू थोरे
चांदवड : चांदवड तालुक्यातील जोपुळ येथील रहिवासी प्रा.महेश वाघ यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील विद्यापीठात इतिहास विषयात पीएचडी (विद्यावाचस्पती)पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
“महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील योगदानाचा ऐतिहासिक अभ्यास” या विषयावर प्रा.वाघ यांनी शोधनिबंध सादर केला होता. संशोधनासाठी प्रा.डॉ.सुनील अमृतकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.१९०५ ते १९४७ ह्या कालखंडातील हा संशोधन विषय होता.
प्रा.महेश वाघ हे छत्रपती शिवाजी महाराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून १००हून अधिक शिवचरित्र व्याख्याने त्यांनी राज्यभर केली आहे. चांदवड तालुक्यातील ऐतिहासिक घटनांचा,वास्तूंचा लेखाजोखा असलेल्या ‘आपलं चांदवड’ या पुस्तकाचे त्यांनी संपादन केले असून . सेट व नेट या दोन्ही परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत. नेट परीक्षेत इतिहास विषयात महाराष्ट्रात पहिला क्रमांक त्यांनी पटकावला होता.त्यांना ‘मदर तेरेसा गोल्ड मेडल पुरस्कार२०२२,जय किसान फोरमच्या वतीने देण्यात येणार ‘डॉ पंजाबराव देशमुख आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ ही मिळालेले आहेत. सध्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाणा येथे ते कार्यरत असून गेली तेरा वर्ष अध्यापन करीत आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल म. वि.प्र.संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय निलिमा ताई पवार यांनी अभिनंदन केले.तसेच संस्थेचे अध्यक्ष आदरणीय तुषार दादा शेवाळे, उपसभापती आदरणीय राघो नाना अहिरे,संचालक प्रशांत देवरे, भाऊसाहेब खातले,प्रल्हाद दादा गडाख,विश्राम निकम,प्रा.विद्या सुर्वे,प्रा.डॉ.नितीन जाधव,प्रा.डॉ.कैलास सलादे,प्रा.डॉ.सुदाम राठोड,विष्णू थोरे,श्याम पगार,अनिल पाटील, कल्पना पाटील,पंकज गांगुर्डे समाधान वायकांडे, सुनील वरुंगसे, पुरुषोत्तम तायडे,भगवान शिंदे, प्रा.नारायण शिंदे,संतोष बोडके,मंगेश ठोंबरे,अभिमन्यू ठाकरे आदीनी त्यांचे अभिनंदन आणि सत्कार केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम