Skip to content

गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक; एक कॉन्स्टेबल गंभीर जखमी


गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत एक पोलिस कॉन्स्टेबल गंभीर जखमी झाला असून हेलिकॉप्टरद्वारे तातडीने उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आली आहे. पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, राज्याची राजधानी मुंबईपासून ९०० किमी अंतरावर भामरागडमधील दोदराज जंगलाजवळ गडचिरोली पोलिसांचे विशेष लढाऊ तुकडी असलेल्या सी-६० कमांडोचे पथक या भागात गस्ती करताना ही चकमक सुरू झाली. पथकावर गस्तीदरम्यान हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर कमांडोंनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. अतिरेक्यांनी गस्ती दलावर गोळीबार केल्यानंतर कमांडोनी चोख उत्तर दिले तेव्हा नक्षलवाद्यांचा पाठलाग केला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात पोलीस जवानाना यश आले आहे.

तसेच काही वेळाने नक्षलवादी जंगलात पळून गेले. मात्र गोळीबारात एक पोलिस हवालदार गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर भामरागडच्या जंगलात पळून गेलेल्या नक्षलवाद्यांसाठी शोधमोहीम सुरू आहे. नक्षलवादी घनदाट जंगलाच्या दिशेने पळून गेले आहेत. गडचिरोली हा एक असा भाग आहे जिथे नक्षलवादी मोठ्या प्रमाणात आढळतात.

 

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!