देवळा प्रतिनिधी : शेतकरी समृध्द तर देश समृद्ध शेतकरी स्वतः मालक बनावा या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी स्वावलंबी बनावा यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येत फार्मर कंपनी स्थापन व्हावी यासाठी देशभर मोहीम राबविण्यात आली याचाच परिपाक म्हणून शेतकऱ्यांनी पुढाकार घेत कंपनी स्थापन करण्यास सुरुवात केली
देवळा तालुका देखील मागे नसून मोठ्या प्रमाणात शेतकरी पुढे येत फार्मर अग्रो कंपनी स्थापन करत आहेत. तालुक्यात खर्डे खोरे फार्मर प्रोड्युसर कंपनी ही नुकतीच स्थापन झाली असून सरकारने कॉर्पोरेट मिनिस्टर अफेअर दिल्ली यांच्याकडून संस्थेला रजिस्ट्रेशन प्राप्त झाल्याची माहिती संचालक मंडळाने दिली आहे.
खर्डे खोरे फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या चेअरमन संदीप अशोक पवार तर व्हायचेअरमन पदी मंदाकिनी एकनाथ गांगुर्डे यांची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास हा उद्देश असून लवकरच ऍग्रो मॉल ची स्थापना शेतमालाची विक्री व्यवस्था तयार करण्यात येणार असल्याची महिती पवार यांनी दिली आहे.
कंपनीच्या माध्यमातून कांदा, मका व भाजीपाला
शेतमाल खरेदी विक्रीचा थेट परवाना घेवून शेतकऱ्यांची उन्नती करणे हा मानस संचालक मंडळाचा आहे. लवरच कंपनीच्या मध्यामतून प्रयोगशील शेती केली जाणार असल्याचे देखील पवार यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम