Skip to content

कांदा उत्पादक हवालदिल , बाजारपेठेत कांद्याला मिळतो 1 रुपये किलो भाव


मुंबई प्रतिनिधी – उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी घसरण होते. कांदा काढणी, मजुरीचा, वाहतूक सर्व खर्च पेलवत नसल्याचे नाशिक येथील कांदा उत्पादकांनी सांगितले. मागील दोन वर्षांत कांदा  उत्पादनाची किंमत दुपटीने वाढली आहे. शेतकऱ्यांवर इतकी बिकट परिस्थिती आली आहे की, काही बाजारपेठेत शेतकऱ्यांना 1 रुपये किलो कांद्याचा भाव मिळला आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव घसरले आले आहेत. कांदा बाजारात नेण्याचा खर्चही शेतकऱ्यांना आता परवडत नाही. तर दुसरीकडे कांदा काढणीचा खर्च आणि मजुरीही सातत्याने वाढत आहे.

शेतकऱ्यांनी कांदा विक्री करण्याएवजी साठवणूक करण्यावर भर दिला आहे. दरवर्षी कांद्याच्या भावात चढ-उतार होतात, शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागतो, या वर्षे कांद्याचे भाव जास्त नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कांद्याच्या उत्पादनात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

काही दिवसांपूर्वी असलेले 3 हजार रुपयांपर्यंतचे कांदा बाजार भाव थेट हजार रुपयांपर्यंत गडगडले आहेत.3 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून कांद्याला किमान 600 ते कमाल 1 हजार रुपये एवढा प्रतीक्विंटलला दर मिळत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!