उन्हाळयात लाईट बिल जास्त येतय ? ; वीज कशी वाचवायची जाणून घ्या ह्या टीप्स

0
1

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : उन्हाळ्यात विजेचा जास्त वापर केला जातो त्यामुळे वीजबील सर्वात जास्त येते आणि याचा अनुभव सर्वांनाच येतो. त्यामुळे काही अंशी यावर मात करण्यासाठी ऊर्जेची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे उन्हाळ्यात घरात एसी आणि कुलरचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या घराच्या वाढत्या वीज बिलामुळे हैराण असाल, तर काही सोप्या टिप्सचा अवलंब करा जेणेकरुन तुमचे वीजबील कमी येईल आणि तुम्ही वीजेची बचतही करु शकणार.

१) दिवसा लाईट बंद ठेवा: जर दिवसा तुमच्या घरात पुरेसा आणि आवश्यक सूर्यप्रकाश येत असेल तर अशा वेळेस लाईट बंद ठेवा. यामुळे तुमच्या वीजबिलात कपात होणार.

२) उपकरणे मेन स्वीचवरून बंद करा: बहुतांश वेळी आपण एसी, टीव्ही रिमोटने बंद करतो. ते मेन स्वीचवरून बंद करत नाही. त्यामुळे वीज बिल मोठ्या प्रमाणावर येते पण असे न करता उपकरणे रिमोटने बंद न करता मेन स्विचवरुन बंद करा.

३) एलईडी लाईटचा वापर करावा: एलईडी लाईटचा वापर केल्याने वीजबील कमी येते. एलईडी म्हणजे ‘लाइट इमिटिंग डायोड’. यामुळे आपण वीजेची बचत करु शकतो.

४) एसी तापमान: उन्हाळ्यात तुम्हाला वीज बिल कमी करायचे असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही एसीचे तापमान २४ डिग्री ठेवावे. २४ डिग्री तापमानात आपण दीर्घकाळ कमी वीज वापरून कुलिंगचा फायदा घेऊ शकता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here