आमच्यात काही मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत; वसंत मोरे

0
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईद दरम्यान आपल्या समर्थकांसह देशभरातील हिंदूंना आवाहन केलं होतं. ठाणे येथील सभेत राज म्हणाले, ज्या ठिकाणी अजान सुरू होईल त्या ठिकाणी हनुमान चालिसा मोठ्या आवाजात वाजवा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावेळी वसंत मोरे यांनी विरुद्ध प्रतिक्रिया दिल्याने राज ठाकरे नाराज दिसले.

मनसेच्या औरंगाबाद येथील सभे करता माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे हे कुठेही दिसले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र अशातच यावर वसंत मोरे यांनीच आपली प्रतिक्रिया दिली, एखाद्या लढाईला एखादा सैनिक नसला म्हणजे कोणी लढाई हरत नाही. माझ्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर होते. आमच्यात काही मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत. मी राजमार्गावरच राहणार असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी सांगितले की, ठाण्याच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी मला मुंबईला बोलावलं होतं. माझ्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता मात्र मी आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत घरचा कार्यक्रम रद्द केला होता. मी घरच्यांना समजावलं, जर गेलो नाहीतर पक्षामध्ये संभ्रम होईल त्यामुळे कार्यक्रम टाळू शकत नाहीत, असं वसंत मोरे म्हणाले. माझ्या भागात कोणत्याही प्रकारची आरती झाली नाही. मुस्लिम बांधवांनी अजानचा आवाज बंद केला. सकाळची अजान अंतर्गत होते. मी केलेल्या आवाहनाला त्यांनी साथ दिल्याचं मोरे यांनी सांगितलं.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here