Skip to content

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकिसाठी कामाला लागा ; जिल्हा प्रमुख सुनील पाटील


देवळा : गटातटाचे राजकारण न करता आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे , असे आवाहन जिल्हा प्रमुख सुनील पाटील यांनी आज येथे केले .शिवसेनेच्या देवळा तालुका प्रमुख पदी मेशी ता देवळा येथील बापू जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

शिवसेनेचे नवनियुक्त तालुका प्रमुख बापू जाधव यांचा सत्कार करताना जिल्हा प्रमुख सुनील पाटील ,समवेत भाऊसाहेब चौधरी ,भाऊलाल तांबडे आदी (छाया -सोमनाथ जगताप )

या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार तसेच जिल्हा परिषदेच्या गट गण निहाय आढावा बैठक (दि ८) रोजी शासकीय विश्रामगृहावर नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . यावेळी ते बोलत होते . देवळा पंचायत समिती वर महाविकास आघाडीची सत्ता असून, जि प च्या तीन गटांपैकी दोन गटात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य आहेत . आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा व पक्ष प्रमुखांचे हात बळकट करण्यासाठी गावागावांत शिवसेनेच्या शाखा उघडून ,घराघरात शिवसेनेचे विचार पोहोचले पाहिजे यासाठी परिश्रम घ्यावीत ,असे आवाहन .

संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी केले . बैठकीस जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, विधानसभा संपर्क प्रमुख नवनाथ निच्चीत, उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ, तालुका प्रमुख बापु जाधव, महिला जिल्हा संघटक भारती जाधव, तालुका संघटक ज्योती थोरात , उप शहर प्रमुख विश्वनाथ गुंजाळ ,उप तालुका प्रमुख भरत देवरे आदींसह वसंत सूर्यवंशी , भाऊसाहेब चव्हाण , सतीश आहेर , विलास शिंदे ,मुन्ना आढाव, योगेश आहेर, गोल्डी निकम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!