अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर यावर्षीच्या” मूलकण” कांदा बियाण्याचा शुभारंभ

0
5

देवळा ; अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर यावर्षीच्या कांदा बियाण्याचे पूजन करून दुर्गामाता मंदिरात शुभारंभ करण्यात आला . कांदा उत्पादक शेतकरी सुनील भामरे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजा करून कांदा बियाणाचा शुभारंभ करण्यात आला .

मागील वर्षी बाजारात आलेले मूलकण कांदा बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले असून ,या बियाणाची वाढती मागणी लक्षात घेऊन येत्या हंगामासाठी कंपनीने बिजोत्पादनात वाढ करून बियाणे विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करून देण्यात आले आहे . बियाणाचा रंग, आकार व भरघोस उत्पन्न या गोष्टींमुळे मूलकण बियाणे
शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे .तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर कांदा बियाणे उपलब्ध होत नाही , झाले तर चढ्या भावात खरेदी करावे लागते तसेच बियाणात फसवणूक देखील होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत .

यामुळे देवळा ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष केदा आहेर यांनी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आपल्या मातोश्रींच्या नावाने ” मूलकण ” कांदा बियाणाची गेल्या वर्षापासून निर्मिती केली आहे . ;या बियाणाला चांगला उतार मिळत असल्याने बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरले आहे . यामुळे तालूक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक थांबणार असून ,वेळेची व पैशांची देखील बचत होणार आहे .शुभारंभा प्रसंगी कंपनीचे अध्यक्ष.केदा आहेर ,संचालक प्रविण मेधणे,संजय आहेर,शुभम निकम आदींसह कांदा उत्पादक शेतकरी ,
कर्मचारी वृंद उपस्थित होते.

मूलकण कांदा बियाणाला चांगला उतार मिळाला असून , कांदा उत्पदनात वाढ झाली आहे . यामुळे शेतकरी समाधानी झाल्याचे पाहून आपण शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगले काम करू शकल्याची भावना मनाला सुखद आनंद मिळवून देणारी ठरली आहे . यापुठेही आपण शेतकऱ्यांसाठी काम करणार आहोत -.केदा आहेर, अध्यक्ष देवळा ऍग्रो प्रोड्युसर कंपनी ,देवळा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here