जिल्ह्यात भाजपा ॲक्टीव्ह मोडवर ; जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर देवळा भाजपा बैठक

0
24

देवळा प्रतिनिधी : राज्यात जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्व पक्ष तयारीला लागले आहेत.  जून मध्य आरक्षण सोडत होणार आहे. याचाच परिपाक म्हणून नाशिक भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हाभर तालुकानिहाय बैठकीचे नियोजन केले आहे. आरक्षण सोडती नंतर  मोर्चा साभाळत तालुक्यासह जिल्हयात भाजपाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी भाजपा आधीच कामाला लागली आहे.

सोमवारी १३ रोजी आगामी जि.प. पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका भाजपाची महत्वपूर्ण संघटनात्मक बैठक आमदार डॉ राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. बैठकीस सर्व शक्ती केंद्र प्रमुख, तालुका व जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी, बुथप्रमूख यांची बैठक होणार आहे.

सोमवारी सकाळी 11 वाजता बाजार समिती मिटींग हॉल, मध्ये पदाधिकारी बैठक होणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी दिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here