राज्यात उष्णतेची लाट असून, नागरिकांना कडकडीत उन्हाचा सामना करावा लागला. विदर्भातील प्रत्येक ठिकाणी तापमानात वाढ होत असून, बुधवारी ब्रह्मपुरीत सर्वाधिक ४५.१ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले आहे.
उत्तर भारतात विक्रमी उष्णता वाढली आहे तर पारा ४४ च्या वर पोहोचला असून नागरिकही हैराण झाले आहे. २८ एप्रिलपासून राष्ट्रीय राजधानीत उष्णतेच्या लाटेच्या स्थितीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, गुरुवारपासून पुढील पाच दिवस राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रणरणत्या उन्हामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतो.
मात्र नाशिक, मालेगाव, पुणे, लोहगाव, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, तसेच औरंगाबाद, परभणी, नांदेड, तसेच विदर्भात सर्व केंद्रांवर तापमान ४० अंशांहून अधिक होते. मराठवाड्यात औरंगाबादचे कमाल तापमान ४२.१ अंशांवर गेले होते. मुंबईचेही तापमान ३७ अंशांवर गेल्याने नागरिकांना उष्णतेच्या लाटेने त्रस्त झाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम