पहाटे नोकरी करता बाहेर पडणाऱ्या महिला तृतीयपंथीने धमकवल्याचा प्रकार उघडकीस आला. अंधेरी-बोरिवलीदरम्यान पहाटेच्या वेळी लोकलने प्रवासा करणारया महिलेला नकली बंदुक दाखवून तृतीयपंथीने लुबाडले. चोरी आणि धमकी दिल्याच्या आरोपावरून सानिया पांचाळ बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली.
तक्रारदार महिला रोज पहाटे फूल विक्रीसाठी दादर येथे येतात. दादर येथून फूल विक्री केल्यानंतर त्या वसईला जातात. तेथून दुसऱया मेमोने त्या भिवंडीला घरी जात असतात. गुरुवारी २१ एप्रिल रोजी सकाळी महिला या फूल विक्री करून वसईला जात होत्या. अंधेरी स्थानक आल्यावर त्यांच्या डब्यात तृतीयपंथी प्रफुल्ल शिरला. प्रफुल उर्फ सानिया पांचाळ असे त्याचे नाव आहे. त्याने महिलेला इशारे करण्यास सुरुवात केली. दारू पिऊन प्रफुल्लने महिलेकडे पैशांची मागणी करू लागला. डब्यात बसलेल्या महिलांकडून पैसे गोळा करून दे असे प्रफुल्लने म्हणणे होते.
महिलेने नकार देताच प्रफुल्लने नकली पिस्तूल काढून महिलेला धमकावले. भीतीपोटी महिलेने तिच्याकडे चार हजार रुपये प्रफुल्लला दिले. लोकल बोरिवली स्थानकात आल्यावर प्रफुल्लने धावत्या लोकलमधून उडी मारून पळ काढला. बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी महिलेने याची माहिती रेल्वे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. पश्चिम रेल्वेचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आज सकाळी प्रफुल्लला विलेपार्ले येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने महिलेला बंदूक दाखवल्याची कबुली दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम