Mumbai Breaking : पावसाळ्यात समुद्राला उधाण येतं हे तर स्वाभाविकच आहे.मात्र प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही काही अतिशहाणे नागरिक समुद्राच्या अगदी जवळ जाण्याचं धाडस करतात.मग अस काही तरी घडून बसत.
Nashik Crime : नाशिकमध्ये तब्बल ९१ लाखांची लूट काय आहे संपूर्ण प्रकरण?
सेल्फी घेत असताना मुंबईच्या किनाऱ्यावर महिला वाहून गेली होती. त्यानंतर जवानांनी तिचा मृतदेह शोधून काढण्यात यश मिळवलं आहे.
मुंबईच्या वांद्रे येथील समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेल्या महिलेचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या बँडस्टँड किनाऱ्याजवळ सेल्फी काढत असताना आलेल्या लाटेत महिला वाहून गेली होती. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी केलेल्या शोधकार्यानंतर महिलेचा मृतदेह हाती लागला.
Nashik Monsoon Update: गेल्यावर्षी गोदावरीला पूर यंदा मात्र अजूनही नाशिकला जोरदार पावसाची प्रतीक्षा
ज्योती सोनार असं मृत महिलेचं नाव असून तिच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. समुद्रातील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओत ज्योती सोनार या महिलेसोबत नेमकं काय झालं, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळं आता मुंबईतील किनाऱ्यावर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना आणखी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सोनार कुटुंबीय वांद्रे येथील किनाऱ्यावर फिरायला गेले होते. यावेळी ज्योती सोनार या त्यांच्या पतीसोबत समुद्रातील एका दगडावर बसून फोटो काढत असताना अचानक मागून मोठी लाट आली. त्यात ज्योती सोनार यांचा पाय घसरला आणि त्या पाण्यात वाहून गेल्या. त्यानंतर किनाऱ्यावर महिला बुडाल्याची बातमी मुंबईत वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर महिलाचा मृतदेह पोलिसांनी शोधून काढला आहे. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
व्हायरल व्हिडिमध्ये ज्योती सोनार त्यांच्या पतीसोबत किनाऱ्यावर सेल्फी घेत होत्या. त्याचवेळी त्यांची मुलं किनाऱ्यावरून त्यांचा व्हिडिओ शूट करत होते. नवऱ्यासोबत सेल्फी काढत असताना मागून आलेल्या लाटेत ज्योती वाहून गेल्या. महिलेच्या मुलांनी आरडाओरड करत त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु तोपर्यंत महिला समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेली होती. महिला समुद्राच्या पाण्यात वाहून जात असल्याचं व्हायरल व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळं आता अरबी समुद्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांना खोल पाण्यात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम