The point now – जिओचे वाउचर आणि सेवा या अतिशय उत्तम असतात हे आपल्या सर्वांना माहित आहे. आणि त्या सेवा आपल्याला सहज उपलब्ध होतात. आपण त्यांचे पॅक मारू शकतो जिओचा नेटवर्क हे सर्वात स्ट्रॉंग नेटवर्क पैकी एक आहे. त्यामुळे आपल्याला बोलताना किंवा ऑनलाईन काम करताना फारसा त्रास सहन करावा लागत नाही परंतु याच सेवांपैकी एक सेवा जिओनी बंद केली आहे. जाणून घ्या सविस्तर
तुम्ही जिओ डेटा लोन सर्व्हिसचे नाव ऐकले असेल. आपत्कालीन परिस्थितीत कंपनीची ही सेवा अतिशय उपयुक्त ठरली. आता तुम्हाला ही सेवा मिळणार नाही. म्हणजेच जिओ डेटा लोन देत नाही. मात्र ही सेवा का बंद करण्यात आली याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. किंवा ते फक्त काही दिवसांसाठी असू शकते
तुम्ही डेटा लोन सेवेबद्दल ऐकले असेलच. Jio देखील अशीच सेवा देत आहे जी कंपनीने बंद केली आहे. म्हणजेच आता जिओ यूजर्सला डेटा लोन सेवेचा लाभ मिळणार नाही. कंपनीने ही सेवा का बंद केली याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही.
जिओ डेटा लोन अंतर्गत ग्राहकांना २ जीबी डेटा लोन मिळत होते. आणि त्यासाठी ग्राहकांना फक्त नंतर २५ रुपये मोजावे लागते . आता कंपनी ही सेवा देत नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार डेटा कर्ज सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. या सेवेशी संबंधित काही महत्त्वाचे तपशील आम्ही तुम्हाला सांगतो
• जिओ डेटा लोन हे नक्की कसे उपलब्ध होते.
जिओ डेटा लोनसाठी युजर्सना पहिल्यांदा माय जिओ ॲप डाऊनलोड करावे लागते त्यानंतर त्या ॲपवर जाऊन येथे तुम्हाला तुमच्या जिओ नंबर वरून लॉगिन करावे लागते आणि वरच्या डाव्या मेनूमध्ये डेटा लोनचा पर्याय उपलब्ध होता. मात्र कंपनीने यावेळी त्यांची आपत्कालीन(इमर्जन्सी) डेटा सेवा बंद केली आहे. म्हणजेच आता जिओ आपल्या यूजर्सना डेटा लोन देत नसल्याचे समोर येते.
बऱ्याच लोकांनी माय जिओ ॲप वरती जाऊन ही सेवा शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना हा ऑप्शन मिळालाच नाही. त्यांनी भरपूर वेळा रिफ्रेश केले तरीही हा ऑप्शन काढून टाकल्याचे समोर आले. त्यामुळे ही सेवा सध्यातरी उपलब्ध नाही.
सेवा न देण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र जिओने ही सेवा का बंद केली याची अधिकृत माहिती अजून सांगण्यात आलेली नाही. त्यापेक्षा डेटा लोनची सेवा तात्पुरती उपलब्ध नसल्याचे कंपनीने संदेशात म्हटले आहे. यासाठी वापरकर्त्यांना डेटा व्हाउचर वापरावे लागतील. म्हणजेच तुमचा डेटा संपला तर तुमच्याकडे फक्त डेटा व्हाउचरचा पर्याय आहे. कारण जिओची ही सेवा बंद झाल्यामुळे आता फक्त तुम्ही डेटा वाउचरच वापरू शकता. जिओचे डेटा व्हाउचर 15 रुपयांपासून सुरू होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम