वार्शी धरणाचा सांडवा निघाला, शेतकरी सुखावला

0
25

पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; वार्शी धरणाचा सांडवा निघाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. धरणाचा सांडवा (पूर पाणी) (13 जुलै) रोजी दुपारी निघल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या वर्षी हाच सांडवा 23 सप्टेंबर रोजी निघाला होता. यावर्षी लवकर धरण भरल्याने शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. खर्डे व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पावसाचा जोर कायम असल्याने लवकरच पूर पाणी खर्डे येथील धोडी धरणात दाखल होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

9 जुलै पासून तालुक्यातील धोडप किल्ला तसेच विख्याऱ्या डोंगरावर पावसाचा जोर वाढल्याने वार्षी धरण भरून पूर पाणी नदी पात्रात निघाले आहे. रात्री उशिरा पाण्याचा जोर वाढल्याने खर्डे व परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून पूर पाणी हे येत्या 24 तासात धोडी धरण परिसरात दाखल होईल.

तालुक्यासाठी वार्षी धरण जीवनदायी….
वार्षी धरण हे तालुक्यातील जनतेसाठी वरदान ठरत आहे. वार्षीच्या पूर्वजांनी दूरदृष्टी ठेवून स्वतःची दिलेली जमीन हे भविष्यासाठी व तालुक्यासाठी किती महत्वाची घटना आहे हे अधोरेखित होते. तालुक्यासाठी वार्षी धरणाचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

वार्षी धरणावर खर्डे(वा) तसेच परिसरातील शेतकऱ्यांची मदार आहे. वार्षी धरण भरले तरच त्या खोऱ्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता येतात. सुरवातीला पावसाने उघडझाप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, मात्र तीन दिवसात मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

देवळा तालुक्यातील हनुमंतपाडा, वार्षी, मुलूकवाडी , खर्डे, शेरी, कांचने, कणकापूर या गावांमध्ये पावसाचा जोर वाढता आहे.

कांद्याच्या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची बी (उळे) टाकले असून तीन दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने रोप खराब होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच बाजरी भुईमूग यांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे. सतत चालणाऱ्या पावसामुळे मका तसेच तुरीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here