तुम्ही गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा मराठी सिनेमा पाहिला आहे का, यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ लागावा आणि विरोधकांना अर्ज दाखलच करता येऊ नये म्हणून डिपॉझिट म्हणून भरावी लागणारी रक्कम नाण्यांच्या स्वरूपात घेऊन येणारे मकरंद अनासपुरे यांच्या या अनोख्यामुळे शक्कल मुळे हा चित्रपट राज्यभरात चांगलाच गाजला होता. मात्र पतीला पोटगी देण्यासाठी एका इसमाने तब्बल 55 हजार रुपयांची नाणी न्यायालयात जमा केली असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर?
हो असाच एक प्रकार राजस्थान मधल्या जयपुर शहरातून समोर आला आहे. जयपूरच्या कुटुंब न्यायालयामध्ये हुंड्यासाठी त्रास देण्याच्या केसमध्ये न्यायालयाने एका आरोपी पतीला तुरुंगवासाची शिक्षा दिली आणि पत्नीला पोटगी म्हणून त्याला 55 हजार रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आला. आरोपी पतीच्या कुटुंबीयांनी ही रक्कम जमा केली खरी मात्र ती 55 हजार रुपयांची रक्कम पाहून न्यायाधीशांचे देखील डोळे चक्रावले.
पतीने पोटगी म्हणून पत्नीला दिलेली पंचावन्न हजार रुपयांची रक्कम चक्क पोत्यामध्ये भरून आणली होती. 55 हजार रुपयांसाठी पोती कशाला? असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडला, मात्र त्या आरोपी पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी 55 हजार रुपये हे नोटांच्या स्वरूपात न देता चक्क एक, दोन, पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांच्या स्वरूपात दिले. जवळपास 280 किलो वजन असलेली सात होती या बहाद्दरांनी न्यायालयात जमा केली. यामुळे ही पोती न्यायालयात जमा करत असताना होणाऱ्या आवाजाने संपूर्ण न्यायालय खणखणून निघालं होतं. हे पैसे न्यायालयाने जमा करून सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिला खरा, मात्र जयपुर मध्ये घडलेल्या या अनोख्या घटनेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोटगी च्या स्वरूपात इतक्या मोठ्या प्रमाणावर नाणी जमा करण्यात आल्याची ही देशातील पहिलीच केस असल्याचे देखील बोलले जात आहे. तर सध्या या नाण्यांच्या पोटगीचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम