विनोद कांबळींचा नोकरीचा प्रश्न सुटला, उद्योजक ऑफर लेटरसह कांबळींच्या घरी

0
42

मुंबई – आर्थिक विवंचनेत सापडलेले माजी क्रिकेटपटू  विनोद कांबळी यांच्या नोकरीचा प्रश्न अखेर सुटला आहे. मराठमोळे उद्योजक संदीप थोरात यांनी काही दिवसांपूर्वी कांबळींना एक लाख पगाराच्या नोकरीची ऑफर दिली होती. ही ऑफर कांबळी यांनी स्विकारली असून संदीप थोरात यांनी स्वतः विनोद कांबळी यांच्या घरी जाऊन ऑफर लेटर दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी यांना आर्थिक चणचण जाणवत होती. तशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत आपली व्यथा मांडली होती. त्यानंतर थोरात यांनी कांबळींना सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीत नोकरीची ऑफर दिली होती. ती त्यांनी स्वीकारली असून, आज थोरात ह्यांनी कांबळींच्या घरी भेट देऊन त्यांना कंपनीचा ऑफर लेटर सुपूर्द केला. विनोद कांबळी सह्याद्री मल्टिसिटी फायनान्स कंपनीच्या मुंबई शाखेत मानद संचालक म्हणून काम पाहणार असून त्यांना मासिक एक लाख रुपये इतके वेतन मिळणार आहे. अखेर कांबळींना नोकरी मिळाल्याने त्यांच्या चाहत्यांनीही समाधान व्यक्त केले आहे.

विनोद कांबळींची क्रिकेट कारकीर्द

विनोदने आपल्या कारकीर्दीची सुरुवात शालेय वयापासून केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत हॅरिस शिल्डमध्ये केलेला ६६४ धावांच्या भागीदारीचा विक्रम आजही अबाधित आहे. त्यांनी १७ कसोटी आणि १०४ वनडे सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटीत भारताकडून सर्वात वेगाने १ हजार धावा करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. काही वर्षापूर्वी त्यांनी सचिनच्या क्रिकेट अकादमीत प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here