राज्यात मराठा समाजाचा आवाज बनलेल्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला आहे शिवसंग्रामचे दिवंगत नेते Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झाल अन् संपूर्ण महाराष्ट्र हळहळला मात्र हा अपघात घडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अपघात की घातपात ही शंका मोठ्या प्रमाणात बळावली कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केली त्यानंतर विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली अन् कुठेतरी गडबड असल्याची शंका उपस्थित झाली.
अंत्यविधीला काही तास उलटत नाही अशातच आता सोशल मीडियावर मेटेंच्या कार्यकर्त्याची एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज विनायक मेटेंच्या अपघातापूर्वी त्यांच्यासोबत असलेले आणि त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा आहे. या ऑडिओ क्लिपमधून तीन ऑगस्टला सुद्धा मेटे यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप मायकर यांनी केला आहे. याप्रकरणानंतर ज्योती मेटे यांनी स्वतः मायकर यांच्याशी संवाद साधला असून संपूर्ण माहिती समजून घेतली आहे.
विनायक मेटे यांचा अपघात धक्कादायक असून अपघाता संदर्भातील कॉल रेकॉर्डींग समोर आल्यानंतर या संदर्भात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याशी पत्रकारांनी संपर्क केला असता त्या म्हणाल्या की, “व्हायरल होत असलेली क्लिप मी नुकतीच ऐकली आहे. अण्णासाहेब मायकर यांच्याशी देखील माझं बोलणं झालं असून त्यांनी सांगितल्यानुसार समोरच्या गाडीवर आपली गाडी नेऊन आदळावी, अशा पद्धतीनं ती गाडी ओव्हरटेक करत होता अशी धक्कादायक माहिती मायकर यांनी दिली. ही बाब निश्चितच आक्षेपार्ह्य होती. त्यामुळे या एकूण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे असे देखील ज्योती मेटे म्हणाल्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे.
मेटे पुढे म्हणाल्या की अपघातातील गाडी आणि तीन तारखेची गाडी यांची देखील चौकशी झाली पाहिजे संपूर्ण प्रकाराची चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे.”, अशी मागणी पुन्हा एकदा विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.
तपास कसा सुरुये याबाबत मला माहीत नाही : ज्योती मेटे
अपघात की घातपात याची चौकशी सुरू असली तरी “या संपूर्ण प्रकरणाचा तपास कोण करतंय? किंवा तपास कसा सुरु आहे, याबाबत मला काहीच सांगता येणार नाही. मला याबाबत माहिती नाही.”, असं मत ज्योती मेटे यांनी व्यक्त केले आहे. “सर्व तपास यंत्रणांकडे माझी, शिवसंग्राम कुटुंबियांची हीच मागणी असेल की, निपक्षपातीपणे ही चौकशी झाली पाहिजे आणि जे काही सत्य असेल, ते तातडीनं सर्वांसमोर आलं पाहिजे.” , असंही मेटे म्हणाल्या.
शिवसंग्रामचे कार्यकर्ते आक्रमक
विनायक मेटे यांच्या अपघाताची चौकशी न झाल्यास शिवसंग्रामकडून राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून अपघाताची चौकशी अरुण ज्या गाडीनं काही दिवसांपूर्वी त्यांचा पाठलाग केला होता, त्या गाडीचा नंबर देखील समोर आला असून त्याचा देखील शोध पोलिसांनी घ्यायला हवा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम