द पॉइंट नाऊ प्रतिनीधी; देशात धार्मिक तणाव वाढत असून यात विश्व हिंदू परिषद व बजरंग दालने उडी घेतली असून आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. गुरुग्राम मध्ये दोन्ही संघटनांनी शस्त्रे घेण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. नंबर जारी करण्यासोबतच पीडित हिंदू आमच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून मदत मागू शकतात, असे संघटनेने म्हटले आहे.
गुरुग्राममधील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने शुक्रवारी घोषणा केली की ते हिंदूंना स्वसंरक्षणासाठी शस्त्रे मिळवून देण्यास मदत करतील. तसेच शस्त्रास्त्राचा परवाना मिळण्याबाबत बोलले. दोन्ही संघटनांनी शस्त्रे घेण्यासाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. हिंदू देवी-देवतांचा अपमान सहन करणार नाही, असे संघटनेने म्हटले आहे.
यापूर्वी अमरावतीमधील उमेश कोल्हे आणि उदयपूरमधील कन्हैया लाल यांच्या हत्येनंतर विहिंपने आपल्या ट्विटर हँडलवरून हेल्पलाइन क्रमांक जारी केला होता. नंबर जारी करण्यासोबतच पीडित हिंदू आमच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून मदत मागू शकतात, असे संघटनेने म्हटले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम