वसाका आयकर विभागाच्या रडारवर सकाळपासून झाडाझडती सुरू

0
37

देवळा : राज्यात विविध ठिकाणी आयकर विभागाने छापा टाकला असून देवळा तालुक्यात देखील आज सकाळ पासून ही कारवाई सुरू असून एकच खळबळ उडाली तालुक्यातील विठेवाडी (vithewadi) येथील भाडेतत्त्वावर चालविण्यात देण्यात आलेला वसंतराव दादा पाटील साखर कारखाना (Vasantrao Dada Patil Sugar Factory) आयकर विभागाच्या रडारवर आला असून (Income Tax Department) आज सकाळी छापा (Raid) टाकला आहे यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हा कारखाना पंढरपूर येथील उद्योजक अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्या डी व्ही पी ग्रुपच्या माध्यमातून धाराशिव समूहाने भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतला आहे. पुढील २५ वर्षासाठी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतला आहे.

देवळा येथील वसंतदादा पाटील कारखान्यावर आज आयकर विभागाने सकाळच्या सुमारास अचानक छापा टाकल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. तब्बल पाच ते सहा तासापासून वसाका मधील मुख्य कार्यालयात झाडाझडती सुरू आहे.

या कारवाई बाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. याशिवाय कारखान्याच्या आवारात कडे – कोठ पोलीस बंदोबस्त (Police Arrangements) असून कोणत्याही व्यक्तीला कार्यालयात आत येण्या जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळे नेमक काय हाती लागले हे बघणे महत्वाचे आहे.

सहावाजेपासून आयकर विभागाचे पथक कारखान्याच्या मुख्य कार्यालयात ठाण मांडून आहे. या चौकशीनंतर काय निष्पन्न होणार हे लवकरच स्पष्ट होईल.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here