Vardha | राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाहमीच त्यांच्या वादग्रस्त भूमिकांसाठी चर्चेत असतात. त्यांची आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद आणि आरोप प्रत्यारोप यांमुळे ते सध्या चर्चेत आहेत. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून सरसकट आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी आज वर्धा येथे ओबीसी एल्गार मेळाव्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आलेले होते.
मात्र, या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी आता मंत्री छगन भुजबळ हे हजर राहणार नाहीत. मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडल्याने ते येथील एल्गार मेळाव्याच्या सभेसाठी हजर राहू न शकल्याची माहिती समोर आली आहेत. मात्र, या सभेसाठी अपेक्षित असलेल्या पैकी अर्धीही लोकांची संख्या नसल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी सभेला येणे टाळले असल्याची जोरदार चर्चा या ठिकाणी सुरू आहे.
Chagan Bhujbal | इकडे मराठे आंदोलनच करत राहिले; तिकडे भुजबळांनी साधलं ओबीसींचं हित
दरम्यान, संपूर्ण राज्यात ओबीसी एल्गार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. दरम्यान, आज वर्धा येथे ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ह्या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार होती. पण छगन भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्याने ते ह्या एल्गार सभेसाठी उपस्थित राहणार नसल्याची सांगितले जात आहे. तसेच, डॉक्टरांशी चर्चा करून आपण उद्या ठाण्याच्या सभेला जायचं की नाही? याबाबत मंत्री छगन भुजबळ हे कळवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांची ‘ती’ केस मागे; भुजबळांना क्लीनचीट
सभास्थळी गर्दीच नाही; म्हणून तब्येत बिघडली
प्रकृती ठीक नसल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी वर्धा येथील ओबीसी एल्गार सभेला गैरहजर असल्याचे सांगण्यात येत असताना, आता दुसरीकडे याच वर्ध्याच्या सभेत अपेक्षित गर्दीच झालेली नसल्याचे चित्र दिसत आहे. वर्ध्यातील ओबीसी एल्गार मेळाव्याच्या सभेच्या ठिकाणी तब्बल २५ हजार ओबीसी बांधव येतील असा अंदाज ह्या सभेच्या आयोजकांकडून वर्तविण्यात आला होता.
त्यानुसारच या सभेची तयारी देखील करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात सभेच्या ठिकाणी ५०० च्या आतच लोकं उपस्थित असल्याचे चित्र होते. यामुळेच वर्धा येथील आजच्या ओबीसी एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ हे हजर नसून, त्यांनी आजारी असल्याची ही कारणे दिल्याचे बोलले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम