दिल्ली : काही दिवसांपूर्वीच मोठ्या थाटामाटात झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा सलग दुसऱ्या दिवशी अपघात झाला असून ट्रेनचा पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे.
गांधीनगर ते मुंबई सेन्ट्रल या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस ही सेमी हाय-स्पीड ट्रेन आज गुजरात येथील आनंद स्थानकादरम्यान जनावरांवर धडकली. यात ट्रेनच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून धडकेनंतर ट्रेन १० मिनिटे ट्रेन थांबली होती.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याबाबत दुजोरा देत सांगितले की, गांधीनगर येथून सुटलेली वंदे भारत ट्रेन मुंबई सेन्ट्रलच्या दिशेने जात असताना मुंबईपासून ४३२ किमी अंतरावर असलेल्या आनंद स्थानकाजवळ एका गायीला धडक दिली. त्यानंतर ट्रेन सुमारे १० मिनिटे थांबली होती. मात्र ताज्या घटनेत ट्रेनचे मोठे नुकसान झाले नसून समोरील भागाचे किरकोळ नुकसान झाले आहे. त्यानंतर ट्रेनची त्वरित दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत झाली. ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे शुक्रवारी गुजरातच्या आणंदमध्ये होते. तेव्हा त्यांनी याबद्दल बोलताना, रुळांवर गुरांची टक्कर टाळणे अवघड आहे आणि सेमी-हायस्पीड वंदे भारत ट्रेनची रचना करताना हे लक्षात ठेवण्यात आले असल्याचे यावेळी बोलले.
कालच ह्या ट्रेनने ४ म्हशींच्या कळपाला धडक दिल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा ह्या ट्रेनचा अपघात झाला आहे. काल झालेल्या घटनेत मात्र ट्रेनचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे समोरचा भाग बदलावा लागला होता. त्यानंतर संबंधित म्हशीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी ही ट्रेन मुंबईहून गांधीनगरकडे जात होती. विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. वंदे भारत ट्रेन मुंबई ते गांधीनगर दरम्यानचे ५१९ किमीचे अंतर अवघ्या ६ तासात कापते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम