देवळा : तालुक्यातील वाखारवाडी येथील व सध्या मुंबईत जी एस टी विभागात कार्यरत असलेले संजय निकम यांना विभागात राज्यकर सहआयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली आहे. ग्रामीण भागातून एका छोटया गावातून, शेतकरी कुटुंबातील अधिकाऱ्यास ही संधी मिळाल्याने संजय निकम यांच्या प्रामाणिक सेवेचा शासनाने गौरवच केला आहे.
ग्रामीण भागातील गुणवंत विध्यार्थ्यांना घडविण्याचं व त्यांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी बनविण्याचं महान कार्य करणाऱ्या शासकीय विद्या निकेतनचे संजय निकम हे माजी विध्यार्थी असून पुण्यातील फर्ग्यूसन तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय त्यांनी आपले शिक्षण विशेष गुणवत्तेत पूर्ण केले आणि एम पी एस सी द्वारे ते महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागात वर्ग 1 पदी अधिकारी पदावर काम करण्याची संधी 1995 मध्ये निकम यांना मिळाली.
शासनाच्या सेवेत काम करत असताना त्यांनी एक अत्यंत अभ्यासू, प्रामाणिक, संशोधक, नवनवीन संकल्पना मांडून त्या प्रत्यक्षात आणणारा अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला.या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शासनाने आणि विविध संस्थानी वेळोवेळी त्यांचा पुरस्कारांच्या माध्यमातून गौरव केला आहे.
केंद्र सरकार अभ्यासू अधिकाऱ्यांना प्रशिक्षण आणि अभ्यास दौऱ्यांसाठी परदेशी पाठवत असते.लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स येथे आणि अमेरिकेत जाण्याची संधी निकम यांना लाभली आहे.जी एस टी च्या विविध समित्यांवर त्यांनी यशस्वीरित्या काम केले आहे.
वरिष्ठपदी निकम यांची नियुक्ती झाल्याने त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम