देवळा-मालेगाव रस्त्यावरील अपघातात वाजगावचा युवक ठार

0
62

देवळा : देवळा-मालेगाव रस्त्यावर धोबीघाट परीसरात मोटारसायकल व ट्रॅक्टर यांच्यात शुक्रवार (दि.२३) रोजी झालेल्या भीषण अपघातात वाजगाव येथील अमोल विजय देवरे (वय २८) हा दुचाकीस्वार ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.
Trambkeshwar : नाशिक ग्रामीण पोलिसांनी केला सत्तेऐंशी लाखांचा गुटखा जप्त
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार (दि.२३) रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेच्या दरम्यान वाजगाव (ता. देवळा ) येथील अमोल विजय देवरे व पराग मोरे हे दोन युवक मोटारसायकलने ( एमएच ४१ एव्ही४१०५ ) मालेगाव कडून देवळा येथे येत असतांना धोबीघाट परीसरात देवळयाकडून वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला समोरून जोरात धडक दिली. त्यात अमोल देवरे गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त कळताच दहिवड व परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. दहिवड प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहीकने दोघा जखमींना मालेगाव शासकीय रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू केले. मात्र डॉक्टरांनी अमोल देवरे याची तपासणी करून तो मृत झाल्याचे घोषित केले. पराग मोरे (वय २६) याचे वर पुढील उपचार सुरू आहेत. सदर ट्रॅक्टर हा मेशी येथील असल्याची माहीती मिळत आहे.

शवविच्छेदनानंतर अमोलचा मृतदेह वाजगाव येथे आणण्यात आला. रात्री उशीरा शोकाकुल वातावरणात अमोलवर वाजगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अमोलच्या पश्चात आई वडिल, भाऊ, बहीण असा परीवार आहे. वसाकाचे निवृत्त कर्मचारी विजय बळीराम देवरे व ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी देवरे यांचे ते पुत्र होत.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here