बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या एमएलसी होण्याच्या स्वप्नांना ग्रहण लागले आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र पाठवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेकडे पाठवलेल्या १२ नावांची शिफारस रद्द करावी, अशी विनंती केली आहे. ही यादी रद्द करण्याबाबत राज्यपाल लवकरच नव्या सरकारला पत्र देतील, अशी शक्यता आहे. यानंतर शिंदे-भाजप सरकारकडून 12 नावांची नव्याने शिफारस केली जाणार आहे.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे शिफारस केलेल्या १२ नावांमध्ये शिवसेनेच्या उर्मिला मातोंडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकनाथ खडसे यांचा समावेश आहे. ही शिफारस बऱ्याच दिवसांपासून राज्यपालांकडे प्रलंबित होती.
अशी होती उद्धव ठाकरेंची यादी:
शिवसेना – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, विजय करंजकर, नितीन बानुगडे पाटील आणि चंद्रकांत रघुवंशी.
राष्ट्रवादी काँग्रेस – एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे.
काँग्रेस – रजनीताई पाटील, सचिन सावंत, अनिरुद्ध वनकर, मुजफ्फर हुसेन.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर विधानपरिषद सदस्यपदासाठी राज्यपालांकडून 12 नावांवर नव्याने विचार केला जाणार असल्याची चर्चा होती. उद्धव ठाकरे यांनी पाठवलेल्या यादीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपालांनी भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. आपले नाव यादीतून वगळावे, अशी विनंती त्यांनी केली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम