Urea thrown on onion : अज्ञाताने डाव साधला, शेतकऱ्याचा लाखोंचा कांदा रात्रीत सडला

0
22

Urea thrown on onion : सटाणा तालुक्यातील मौराणे येथील निंबा शेवाळे यांनी चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञात समाज कंटकाने युरिया टाकला. त्यामुळे त्यांचे पंचेचाळीस ट्रॉली कांदा खराब झाल्याने त्यांचे सुमारे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाले. चांगला भाव मिळेल या आशेने त्यांनी कांदा साठवून ठेवला होता. पण, युरीया टाकल्यामुळे शेवाळे यांचे वार्षिक आर्थिक गणित बिघडले आहे.

आधीच अस्मानी सुलतानी संकटांवर मात करीत त्यांनी मोठ्या कष्टाने त्यांनी कांदा पिकविला होता. सध्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा चाळीत साठवला होता. मात्र अज्ञाताने चाळीत युरिया टाकून त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरविले आहे.

काबाडकष्ट करून पिकवलेल्या व पोटाचा मुलांप्रमाणे सांबळलेला कांद्याचे काही क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने शेवाळे यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. या प्रकरणी अज्ञात समाज कंटकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अज्ञात समाज कंटकाचा शोध घेत आहे.

मालेगाव तालुक्यातील लोणवाडे शिवारातील एका शेतकऱ्याने सर्व आव्हानांना तोंड देत कष्टाने कांदा पिकवला. पण बाजारात कांद्याचे भाव घसरल्याने तो चाळीत साठवून ठेवला. या कांद्यावर अज्ञाताने युरिया मिश्रीत पाणी टाकल्याने कांद्याचे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले होते.

https://thepointnow.in/sexual-assault-on-five-minor-girls/

शेतकरी काबाडकष्ट करून शेतात धान्य पिकवतो. नैसर्गिक आपत्तीमुळे आणि समाजातील असामाजिक तत्वांमुळे शेतकऱ्यांचे अशा प्रकारचे नुकसान होते. अशा तत्वांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कालच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या ठिकाणी एका कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये तणनाशकाची फवारणी केल्यानंतर त्याच्या शेतातील पीक पूर्णपणे जळून गेल्यामुळे त्या शेतकऱ्याच देखील लाखो रुपयांचं नुकसान झालं. यात तणनाशक फवारणी चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पीक जळाल्याचा दावा खत विक्रेत्याने केला होता. तर तणनाशकामध्ये काहीतरी काळबेर असल्याचे सांगत त्यामुळे आपलं लाखो रुपयांचे नुकसान झालं असल्याचं शेतकऱ्याने सांगितलं होतं

दुसरीकडे आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत या शेतकऱ्याने पिकवलेला लाख रुपयांचा कांदा युरिया टाकण्यात आल्यामुळे सडला आहे. यातून आता उत्पादन खर्च सुद्धा निघणार नसल्याने या शेतकऱ्याच्या अडचणींमध्ये मोठे वाढ झाली आहे. यामुळे या अज्ञात समाजकंटकाचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here