देवळा ; शिक्षक दिनाचे औचित्य साधून दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका भाग्यश्री अतुल पवार यांची जळगांव येथील राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे .
संस्थेने भाग्यश्री पवार यांचे सामाजिक, शैक्षणिक
आणि अन्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य लक्षात घेता राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर केला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. 17 सप्टेंबर रोजी अल्पचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे सकाळी 10 वा. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्षा संदिपा वाघ यांनी दिली.
उपशिक्षिका भाग्यश्री पवार ह्या देवळा नगरपंचायतीच्या विद्यमान नगरसेविका असून ,माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत .पवार यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार डॉ राहूल आहेर ,भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर ,नगराध्यक्षा सुलभा आहेर , बाजार समितीचे सभापती योगेश आहेर,संचालक भाऊसाहेब पगार, नगरसेवक जितेंद्र आहेर , उपनगराध्यक्ष अशोक आहेर ,नगरसेवक मनोज आहेर , हर्षद भामरे आदींनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम