तालुक्यात उपसरपंच पदाची निवडणुक ; कोरम अभावी दहिवड ग्रामपंचायतीची निवडणूक तहकूब

0
45
सटवाईवाडी येथे विजय उत्सव साजरा करतांना नवनिर्वाचित उपसरपंच विलास भामरे समवेत लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत भामरे व सदस्य ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : आज तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकी पैकी कोरम अभावी दहिवड ग्रामपंचायतीची निवडणूक तहकूब करण्यात आली आहे. ती निवड उद्या मंगळवारी दि १० रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक दत्तात्रेय सूर्यवंशी यांनी दिली. तर उर्वरीत १२ ग्रामपंचायती मध्ये उपसरपंच निवडणूका बिनविरोध पार पडली.

सटवाईचीवाडीच्या उपसरपंच पदी विलास भामरे यांच्या निवडी प्रसंगी सरपंच चंद्रकांत आहेर समवेत सदस्य (छाया – सोमनाथ जगताप )

गावं निहाय निवडून आलेले उपसरपंच पुढीलप्रमाणे ; भऊर – सुनिता संजय पवार ,
फुलेनगर – दादाजी शिवराम बागुल
वासोळ – भिकुबाई सुदाम पवार
मटाणे – संदिप शिवाजी ठुबे
खामखेडा – श्रावण तुळशिराम बोरसे
विठेवाडी – सुनंदा विठोबा सोनवणे
डोंगरगांव – रत्ना नागेश सावंत
वाजगांव – सुनिल नरहरी देवरे
कनकापूर – अनुराधा तुळशिराम जैन
श्रीरामपूर – प्रशांत त्रंबक निकम
सटवाईवाडी – विलास लक्ष्मण भामरे
चिंचवे – नितीन वामन वाघ

याप्रमाणे दरम्यान याप्रसंगी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही . निवडणूक शांततेत पार पडली. निवड झाल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here