उमराणे येथे “ना नफा ना तोटा” या तत्वावर वही विक्री केंद्राचे उद्घाटन

0
53
उमराणे येथे जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने गुणवंन्त विध्यार्थ्यांचा सत्कार व “ना नफा ना तोटा” या तत्वावर वह्या वाटप करतांना जि प सदस्य यशवंन्त शिरसाठ ,नंदन देवरे आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : उमराणे येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने शालेय विद्यार्थांसाठी “ना नफा ना तोटा” या तत्वावर वही विक्री केंद्राचे उद्घाटन तसेच सन २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या इ.१०वी व इ.१२वी च्या गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा आज गुरुवारी( दि १५) रोजी नुकताच संपन्न झाला.

उमराणे  येथे  जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने गुणवंन्त विध्यार्थ्यांचा सत्कार व   “ना नफा ना तोटा” या तत्वावर वह्या वाटप करतांना   जि प सदस्य यशवंन्त शिरसाठ ,नंदन देवरे आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

जाणता राजा मित्र मंडळाच्या स्थापनेपासून म्हणजेच गेल्या ३० वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.यावर्षीही प्रथमत: धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून “ना नफा ना तोटा” तत्वावर आधारित वही विक्री केंद्राचे उद्घाटन छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक पि.के.सुर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इ.१०वी व इ.१२वी त विशेष प्रविण्याने उत्तीर्ण झालेल्या पल्लवी वाघ, हर्षाली देवरे, अंतरा हिरे, सिद्धेश मोरे, वैभव देवरे, रोहिणी पगारे, दिक्षा सोनवणे, भाग्यश्री गांगुर्डे, नुतन पवार, मंजुषा देवरे, भाग्यश्री देवरे या विद्यार्थांना जि.प.सदस्य यशवंत शिरसाठ यांच्या हस्ते ‘शिवचरित्र’ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार विनोद पटनी हे होते . प्रमुख पाहुणे म्हणुन माजी सरपंच मोठाभाऊ देवरे, दिलीप देवरे, ग्रा.पं . सदस्य सचिन देवरे, केदा देवरे, राजाराम देवरे, साहेबराव देवरे, बंडू देवरे, शांताराम देवरे, संदीप देवरे, सुरेश देवरे, माणिक देवरे, ललित देवरे, भरत देवरे, संजय सोनार आदी उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष .नंदन देवरे यांनी प्रास्ताविक केले . जाणता राजा मित्रमंडळ विविध समाजपयोगी उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून अखंडपणे सुरु असल्याने आजच्या नवतरुणांना आदर्श निर्माण करण्याचे काम मंडळाच्या माध्यमातून होत आहे.असे प्रतिपदान विनोद पाटणी यांनी केले .हेमंत देवरे यांनी आभार मानले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here