
देवळा ; तालुक्यातील उमराणे येथील श्री रामेश्वर कृषी मार्केटमध्ये शेतकरी सवलत योजना उपक्रम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून, याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. गेल्या दीड वर्षांपासून उमराने येथे नव्याने श्री रामेश्वर कृषी मार्केट सुरू झाले. त्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .

या मार्केट मध्ये शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सवलत योजना उपक्रम सुरू करण्यात आला . या उपक्रमाचे सोमवारी(२६) रोजी आमदार डॉ राहुल आहेर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर ,बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे , माजी सभापती विलास देवरे , जि प सदस्य यशवंत शिरसाठ , पंचायत समितीचे उपसभापती धर्मा देवरे आदी उपस्थित होते .
रामेश्वर कृषी मार्केट मध्ये येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी सवलत योजना सुरू करण्यात आली आहे .याचा फायदा शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी होणार आहे. अल्पावधीत सुरू झालेल्या या कृषी मार्केटने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला असून, यामुळे त्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . कांदा खरेदी पाठोपाठ टोमॅटो ,तूरची देखील खरेदी सुरू केली आहे . या मार्केट मुळे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले असून,भविष्यात विविध योजना राबविण्यासाठी मार्केट प्रयत्नशील असल्याचे सचिव दौलतराव शिंदे यांनी सांगितले .
याप्रसंगी कांदा व्यापारी प्रकाश ओस्तवाल,खंडू काका देवरे ,बाळासाहेब देवरे, संतोष बाफना ,प्रवीण बाफना, बाजार समितीचे संचालक राजेंद्र देवरे ,किशोर जाधव, कल्पेश गांगुर्डे, सचिन देवरे,प्रभाकर देवरे आदींसह शेतकरी ,व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम