Bus accident: उमराणे महामार्गावर बस ट्रक अपघात; 27 प्रवाशी जखमी

0
47

सोमनाथ जगताप
देवळा ; येथील उमराणे महामार्गावर आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास बस व ट्रक यांच्यात अपघात Bus accident होऊन बसमधील २७ प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील तीन प्रवाशी गंभीर जखमी असल्याने त्यांना मालेगांव येथे उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर अपघातात जखमींवर उमराणे ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेले उपचार व अपघातग्रस्त नाशिक चाळीसगांव बस (छाया – सोमनाथ जगताप )

याबाबत सविस्तर माहिती अशी की , आज मंगळवारी दि ७ रोजी सकाळी 9 वाजता मुंबई आग्रा महामार्गावरील उमराणे नजीकच्या सांगवी येथे गतिरोधक जवळ भरधाव वेगाने जाणारी नाशिक चाळीसगांव एसटी बस क्रमांक बस MH14BT2359 ने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने बसमधील२७ प्रवाशी जखमी झाले आहेत.

यातील 3 प्रवाशी गंभीर जखमी असल्याने त्यांना मालेगांव येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये वाहन चालक जितू पवार ,वाहक योगेश राठोड, प्रवासी नामदेव आहेर ,शिरसाटे विजया खाडे नाशिक, पुरुषोत्तम खाडे नाशिक ,विजय पवार ,दिंडोरी सुभाष बोरसे ,नाशिक प्रदीप शांताराम पाटील, नाशिक प्रशांत शिवाजी बोरसे, नाशिक अशा हिलाल पवार ,नाशिक श्याम मधुकर विसपुते ,कमल गोकुळ साळुंखे ,नासिक आप्पा किसन मोरे ,भालचंद्र चिंचोळे नाशिक ,विजय पवार ,मंगला भालचंद्र चिंचोले ,नाशिक यांचा समावेश आहे.

या सर्व जखमींना उमराणे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उमराणे येथील जाणता राजा मंडळाचेअध्यक्ष नंदन देवरे, उमराणाचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत देवरे, माजी सभापती विलास देवरे आदींसह कार्यकर्ते दाखल होऊन त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व सोमा कंपनीची रुग्णवाहिकेने सर्व जखमींना उपचारासाठी मालेगाव व उमराणे येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले.

या घटनेचा देवळा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्य पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here