धर्मवीर आनंद दिघे जयंती उमराणे येथे साजरी

0
56

देवळा : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती उत्सवा निमित्त उमराणे येथे जाणता राजा मित्रमंडळ ग्रामस्थांच्या वतीने प्रतिमा पुजन करून विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. उमराणे येथे जाणता राजा मित्र मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच गुणवंत विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळातर्फे दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

वरवंडी येथे जि प मराठी शाळचे ध्वजारोहण करतांना ग्रा.प.सदस्य संदिप बच्छाव समवेत सरपंच ,उपसरपंच ,सद्स आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

यावर्षीही शुक्रवार दि २७ रोजी धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती उत्सवा निमित्त प्रथमतः छत्रपती संभाजी राजे चौकात दिघे साहेबांच्या प्रतिमेचे पुजन महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या वंशावळीतील उमराणे येथील प्रथम ठेकेदार पुंडलिक गायकवाड यांचे शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी नाशिक जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली विध्यार्थिनी कु. साक्षी लक्ष्मण खैरनार हिचा शिवचरित्र भेट देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या सामाजिक कार्याबद्दल सविस्तर माहिती विषद केली. पाटील यांनी मंडळाच्या आजवरच्या विविध उपक्रमांबाबतच्या कामांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन माजी सरपंच सुभाष देवरे, मुरलीधर देवरे, बळीराम पवार, नाना देवरे, रत्नाकर देवरे, पंढरीनाथ सावंत, भाऊसाहेब देवरे, संजय देवरे, बंडू देवरे, प्रविण देवरे, डॉ. रमेश गायकवाड, साहेबराव देवरे, भिला देवरे, केदा देवरे, आदी मान्यवर उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सद्स व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. संदिप देवरे यांनी आभार मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here