राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उदयकुमार आहेर

0
11
मुंबई / राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी देवळा येथील उदयकुमार आहेर यांना नियुक्तीपत्र देतांना नामदार दिलीप वळसे पाटील आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी देवळा येथील उदयकुमार आहेर यांची नियुक्ती करण्यात आली . आहेर यांच्या नियुक्तीचे त्यांच्या समर्थकांनी पाचकंदीलवर फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले . पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री .अजित दादा पवार यांच्या आदेशाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष .खासदार सुनील तटकरे यांनी उदयकुमार आहेर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली.

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी देवळा येथील उदयकुमार आहेर यांना नियुक्तीपत्र देतांना नामदार दिलीप वळसे पाटील आदी छाया सोमनाथ जगताप

आहेर यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या वैशालीताई जवंजाळ यांची महिला प्रदेश सरचिटणीस पदी, तसेच बुलढाणा येथील नेते . पंजाबराव देशमुख यांची प्रदेश चिटणीस पदी व नंदुरबार येथील ज्येष्ठ नेते. संतोषराव मराठे यांची प्रदेश चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार दिलीप वळसे पाटील व राज्याचे क्रीडामंत्री नामदार संजय बनसोडे , शिवाजीराव गरजे हे उपस्थित होते.

देवळा नगरपंचायतीच्या वतीने “अमृत कलश यात्रा ”

यापुढील काळात राज्याच्या मुख्यमंत्री पदावर सन्माननीय अजित दादा पवार यांना आरूढ करण्यासाठी, राज्यभरातील आमदारांची संख्या वाढविण्यासाठी आम्ही सर्वजण जोमाने कार्यरत असणार आहोत. आपल्या सर्वांचे आशीर्वाद व सहकार्य आम्हा सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना लाभेल याची खात्री आहे. असे आहेर यांनी यावेळी सांगितले .

यावेळी नगरसेवक संतोष शिंदे ,अमोल आहेर ,संजू आहेर, सतिष सुर्यवंशी, अभिमन आहेर ,अशोक (गटू) आहेर, शिवाजी पाटील, किशोर मेतकर, भावडू आहेर ,शशिकांत चितळे ,संजय मांडगे ,मुन्ना आहेर, दिलीप पाटील ,नितीन आहेर ,पिंटू सुर्यवंशी ,कैलास आहेर आदी उपस्थित होते . \


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here