मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक स्व. विनायक मेटे यांनी तळागाळापर्यंत संघटना पोहचवत कार्यकर्त्यांची एक चांगली मोट बांधली होती. त्यांच्या अकाली निधनाला 4 महिने उलटत नाहीत तोच त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी शिवसंग्राम संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांना पदावरून पदमुक्त करण्यात आल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी जारी केल्याने खळबळ उडाली आहे.
शिवसंग्राम संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांना पदावरून बाजूला सारण्यात आल्याचे पत्र व्हायरल झाल्याने संघटनेत उभी फूट पडल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मात्र अद्याप पदाधिकाऱ्यांनी दिलेली नसली तरी राज्यभरातील पदाधिकारी मुंबईत दाखल झाले असून शिवसंग्रामचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले जात असून बैठकांचे सत्र मुंबईत सतत सुरू आहे
कोण आहेत उदयकुमार आहेर ?
विनायक मेटे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे आजपर्यंत त्यांच्यावर अनेक जनहिताच्या आंदोलनावेळी 29 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून मराठा आरक्षण विषयात त्यांचे पुण्यातील ढोल बजाव मराठा आक्रोश असे राज्यभरात अनेक आंदोलन गाजले आहेत. आक्रमक वक्तृत्व शैली असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता राज्यभरात त्यांच्यासोबत जोडला आहे. विनायक मेटे यांच्या निधनानंतर पक्षाची मोट बांधत सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित ठेवण्यात महत्वाची भूमिका आहे. ज्योती मेटे यांना राज्यात मंत्रीपद देत विधान परिषदेत घ्या ही मागणी देखील त्यांनी केली आहे.
याबद्दल उदयकुमार आहेर यांच्याशी संपर्क साधला असता राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून निर्णय करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम