Baby death : अंगावर गरम पाणी पडले आणि घरातलं लाडक बाळ दगावलं

0
20

Baby death खेळता खेळता गॅसवरील गरम पाणी अंगावर पडलं आणि दोन वर्षीय चिमुरडी दगावली. छत्रपती संभाजीनगर शहरात असलेल्या पडेगाव परिसरात घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पडेगावात कासंबरी दर्गा परिसरात रहाणारे हारुण शेख हे बाहेरून घरी येत होते, त्यामुळे त्यांच्या अंघोळीसाठी पत्नीने गॅसवर पाणी गरम करुन ठेवले आणि हारुण यांच्या पत्नी बाथरुममध्ये काही कामासाठी गेल्या यावेळी गॅसजवळच हारुण यांच्या तीन मुली खेळत होत्या. त्यापैकी सर्वात लहान मुलगी शिद्रा हारून शेख (वय २ वर्षे) हिच्या अंगावर हे गरम पाणी सांडले. उकळते पाणी अंगावर पडल्याने शिद्रा जोरजोरत रडू लागली. मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने आईने तत्काळ धाव घेतली. यात शिद्रा गंभीर भाजली होती. तिच्यावर घाटीत उपचार सुरु असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला

*नेमकं काय घडलं?*

मयत शिद्रा आणि तिच्या दोन मोठ्या बहिणी खेळता खेळता गॅसजवळ आल्या. यावेळी त्यांची आई बाथरूममध्ये काम करत होती. त्याचवेळी शिद्राचा गरम पाण्याच्या भांड्याला धक्का लागला. आणि हे उकळते पाणी तिच्या अंगावर पडले. शिद्राचे किंचाळत रडणे ऐकून आईने धाव घेतली. त्यानंतर तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र आज या चिमुकलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. मात्र घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पडेगाव सह छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here