Nashik News: नाशिकमध्ये अतिरेक्यांचा शिरकाव? काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

0
55

Nashik News: इगतपुरी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील मुख्य गेटवर अचानक लोहमार्ग पोलीस, सुरक्षा बलाचे जवान, बॉम्ब शोध पथक इगतपुरी पोलीस पथक यांनी अचानक धाव घेऊन शहरातील जुना मुंबई आग्रा महामार्ग सील केला. या संपूर्ण झालेल्या प्रकरणामुळे स्थानकावरील प्रवासी आणि नागरिक यांच्यामधे एकच खळबळ उडाली होती. अचानक झालेल्या या घटनेने चांगलाच गोंधळ उडाला होता. मात्र हे सर्व मॉकड्रील असल्याचे समजल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Dharashiv News:आश्रम शाळेतील बाथरूममध्ये आढळला मृतदेह परिसरात खळबळ

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी (दि. ११) सकाळी ११ वाजेच्या सुमारास इगतपुरी रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर असलेल्या वेटींग रूममध्ये दोन चेहरे झाकलेल्या संशयित इसमांनी काही प्रवासी आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांना बंदिस्त करून ठेवल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरील प्रवासी यांनी दिली.

Rupali chakankar : रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढणार?

घटनेचे गांभीर्य लक्षात इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बनकर व रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक राकेश कुमार, इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे , सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे व त्यांच्या पथकाने धाव घेऊन इगतपुरी रेल्वे बुकींग कार्यालय, मुख्य प्रवेशद्वार समोरील जुना मुंबई आग्रा महामार्ग बंद करण्यात येऊन सर्व परीसर निर्मनुष्य करून सील करण्यात आला. यावेळी रेल्वे प्रबंधक प्रेमकुमार आर्या, इगतपुरी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार, रेल्वे सुरक्षा बलाचे पथक, इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, नाशिक ग्रामीणचे डॉग युनिट व त्यांचा बॉम्ब फाइंडर डॉग ॲना, बॉम्ब शोध पथक, नाशिक शहर पोलीस पथक, ATS, QRT नाशिक ग्रामीण यांचे पोलीस अधिकारी व पथके हजर होते. इगतपुरी नगरपरिषदेचे अग्निशमन दल, इगतपुरी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांचे पथक व रुग्णवाहिका त्वरीत घटनास्थळी हजर होत कारवाई केली.

एकूण आठ अधिकारी व ४० अंमलदार यांनी प्रत्यक्ष दहशतवादी घातपात हल्ला विरोधी मोहीमेच्या मॉकड्रील मध्ये सहभाग घेतला. तर नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक सुभाष भामरे यांना माहिती मिळताच ते इगतपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तात्काळ रेल्वे स्थानकावर पोहचले होते. त्यानंतर सर्वांनी मिळून दहशदवाद विरोधी कारवाई करत प्रतिक्षालयात बंदिस्त करून ठेवलेल्या प्रवासी आणि खाद्य पदार्थ विक्रेते यांची सुटका करत संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यानंतर नागरिकांना समजले की लोहमार्ग पोलीस ठाणे, रेल्वे सुरक्षा बल, इगतपुरी पोलीस ठाणे येथे दहशतवादी हल्ल्याप्रसंगी कारवाईची रंगीत तालीम घेण्यात आली होती. हे समजल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेवेळी शहरातील मुख्य रस्त्यावर भीतीचे वातावरण पसरले होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here