संतापजनक! हॉटेल मालकाने ओलांडली क्रूरतेची परिसीमा; भिकाऱ्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकल्याने दोघांचा मृत्यू

0
16

द पॉईंट नाऊ ब्युरो : पुण्यात एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. एका हॉटेल मालकाने तिघा भिकाऱ्यांवर उकळते पाणी टाकल्याने, दोघा भिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

बेघर असणारे, नातलगांनी घरापासून दूर केलेले किंवा इतर कुठल्या कारणास्तव (व्यंग) रस्त्यावर भिक मागणारे अनेक लोक गावोगावी दिसतात. काही कारणास्तव या बिचाऱ्यांना भिक मागून आपले पोट भरावे लागते. ते कधी कुणाच्या देण्या-घेण्यातही नसतात. मात्र पुण्यात सासवड मध्ये निलेश यशवंत जगताप या हॉटेल मालकाने क्रूरतेची सीमा ओलांडली. त्याने तीन भिकाऱ्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकले. यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पुण्याच्या सासवड मधील अहिल्यादेवी मार्केट परिसरातील हॉटेल जवळच्या ओसरीवर हे भिकारी बसत होते. याचाच राग मनात धरून या हॉटेल मालकाने या तिघांच्या अंगावर उकळते पाणी टाकले. 23 मे रोजी घडलेल्या या घटनेचा नुकताच खुलासा झाला आहे. यामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

या हॉटेलजवळच पोलीस स्टेशन आहे. मात्र हा हॉटेल मालक एका आमदाराचा नातेवाईक असल्याने त्याच्यावर पोलिसांनी काही कारवाई केली नाही. असा आरोप केला जात आहे. आता यावर पुढे काय पाऊल उचलले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here