मुंबई : आपल्या शिस्तबद्ध पद्धतीने आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर करवाई करणारे तुकाराम मुंढे हे पुन्हा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालकपदाचा कार्यभार घेताच त्यांनी आपल्या धडाक्याला सुरुवात केली आहे.
नाशिक महानगरपालिकेत जेव्हा ते आयुक्तपदावर होते, तेव्हा त्यांच्या याच कार्यप्रणालीची सर्वांनाच धडकी भरली होती. तसेच त्यांनी याआधीही अनेक ठिकाणी केलेल्या कारवाईची चर्चा संपूर्ण राज्यात होते. याची पुन्हा एकदा प्रचीती आता आरोग्य खात्यात दिसून आली आहे. तुकाराम मुंढे हे काही दिवसांपूर्वी आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालकपदाचा कार्यभार डॉ. एन. रामास्वामी यांच्याकडून घेतला होता. तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना राज्यातील जनतेला आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध राहण्याच्या सूचना त्यावेळी दिल्या होत्या.
त्यानुसार काल रात्री त्यांनी राज्यातील जिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे आरोग्य उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वरिष्ठ डॉक्टर यांच्यामार्फत ही कारवाई करण्यात आली. यावेळी पाहणीवेळी अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी डॉक्टर नसल्याचे निदर्शनात येत त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. व यापुढे अश्या डॉक्टरांवर कडक कारवाईचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तसेच राज्यातील सर्व आरोग्यकेंद्रांना शिस्त लागावी, ती पूर्ण कार्यक्षमतेने सुरु व्हावीत अशी अपेक्षा असल्याचे यावेळी मुंढेंनी सांगितले आहे.
आधी ताकीद द्या, थेट कठोर कारवाई नको – फडणवीसांची प्रतिक्रिया
दरम्यान, मुंढेच्या या थेट कारवाईवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना कारवाई करण्यापूर्वी आधी त्यांना ताकीद दिली पाहिजे, असा सल्ला मुंढे यांना दिला आहे. तसेच आरोग्य विभागात अकाऊंटीबिलिटी गरजेची आहे, सरकार बदलले, तशी अकाऊंटीबिलिटी ठरली पाहिजे. त्यामुळे दरवेळी मोठ्या कारवाईची गरज नाही, कधी कधी त्यांना ताकीद द्यायला हवी. पण जे कामावरच येत नाहीत, अशांवर मात्र कठोर कारवाई ही व्हायला हवी. असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. ते नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम