Travel Update | नुकताच डिसेंबर महिना सुरु झाला असून या महिन्यात ख्रिसमसची सुट्टी असते. या सुट्टीत अनेकांचे फिरायला जायचे प्लॅन होत असतात. तुम्हीपण जर प्लॅन करत असाल तर दक्षिण भारतात नक्की जा. दक्षिण भारतातील तामिळनाडूचे सौंदर्य अगदी पाहण्यासारखे असून रामेश्वरमपासून धनुषकोडीपर्यंत अशी अनेक ठिकाणे इथे पर्यटनासाठी उत्तम आहेत. (Travel Update)
या जागा फक्त भारतीयांनाच नाही तर परदेशी लोकांनाही आकर्षणाचा बिंदु आहेत. इथे एक अशी खास जागा आहे ज्याला पर्वतांची राणी म्हटले जाते. या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या ठिकाणाचे नाव आहे उटी आणि हे तामिळनाडूतील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. येथील विस्तीर्ण चहाच्या बागा, तलाव, धबधबे आणि बागा पाहून पर्यटक मंत्रमुग्ध होतात.
Cars Offer | लक्झरी सेडान कारवर मिळतेय लाखोंची बंपर सूट; कसा घ्याल लाभ?
पायकारा धबधबा
पायकारा धबधबा हे उटीमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे तसेच या धबधब्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी इथे पर्यटकांची खूप गर्दी असते. मुकुर्तीच्या खडकातून उगम पावणारा पायकारा धबधबा तलावात पडतो आणि पायकारा तलावात विलीन होत असतो. हे दृश्य नयनरम्य असते.
टॉय ट्रेन
ऊटी हे ठिकाण ऍडव्हेंचरसाठी प्रसिद्ध असून अनेक पर्यटकांचं हे आवडीचं ठिकाण आहे. या ठिकाणचे हवामान अतिशय प्रसन्न झालेले आहे. येथील ट्रॉय ट्रेनची राइड तुम्हाला फारच आवडेल.
उटी तलाव
जर तुम्ही उटीला जाण्याचा विचार करत असाल तर येथे असलेल्या तलावाला भेट नक्की द्या आणि सुमारे ६५ एकर परिसरात पसरलेला हा तलाव बांधण्याचे श्रेय जॉन सुलिव्हन यांना जाते. हा तलाव १८२४ साली बांधण्यात आलेला होता. (Travel Update)
Marathi Song | ए. टी. पवारांवरील गीत प्रदर्शित! या गौरव गीताला जिल्हाभरातून जोरदार प्रतिसाद
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम