Breaking : नमामी गंगे प्रकल्पावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट ; १५ ठार अनेक जखमी

0
20

Breaking : उत्तराखंडमधील याठिकाणी बुधवारी मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी सुरू असलेल्या नमामी गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने १५ जणांचा मृत्यू झालाय. तर, ७ गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान घटनास्थळी मदतकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड मध्ये असलेल्या चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या काठावर ही घटना घडली असून अचानक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. आणि या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झालाय तर ७ जण जखमी झाले आहेत.

चमोलीचे एसपी परमेंद्र डोवाल यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की, जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही मुरुगेसन यांनी दिलेल्या माहिती नुसार, ‘पोलिस उपनिरीक्षक आणि पाच होमगार्डसह जवळपास १५ जणांचा यात मृत्यू झाला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

रेलिंगवर करंट उतरल्याने ही दुर्घटना घडल्याच प्रथमदर्शनी आढळून आलं आहे. तर तपासात पुढील तपशील समोर येतील. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मुख्यमंत्री धामी हे देखील चमोलीला जाऊन पाहणी करण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळेच ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जातेय संततधार पावसामुळे गंगा, यमुनेसह उत्तराखंड राज्यातील सर्वच नद्यांना पूर आलेला आहे.

https://thepointnow.in/pakisthani-sima-haidar-inquiry-update/

पावसामुळे गंगेची उपनदी असलेल्या अलकनंदा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर पौरी जिल्ह्यातील श्रीनगर येथील GVK जलविद्युत प्रकल्पाच्या धरणातून सुमारे ३००० क्युसेस अतिरिक्त पाणी नदीमध्ये सोडण्यात आले आहे.

घडलेल्या या घटनेमुळे उत्तराखंड मध्ये खळबळ माजली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here