Nashik News : दुगारवाडी धबधब्यात पर्यटक बुडाला शोधमोहीम सुरू

0
44

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी धबधब्यात एक पर्यटक वाहून गेला असल्याची घटना घडली आहे वाहून गेलेल्या पर्यटकाला वनविभाग, पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविली जात आहे.

Breaking : “घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार असो” विधानभवनावर काँग्रेसचे आंदोलन सुरू

राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मान्सून पर्यटनाकडे नागरिकांचा कल वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमत आहे. रविवारी धबधबा पाहण्यासाठी आलेला एक तरुण पर्यटक वाहून वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळ पासून पोलिस, स्थानिक नागरिक आणि वनविभागाचे कर्मचारी त्याचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवत आहेत.

अमित शर्मा (वय १७) असे वाहून गेलेल्या पर्यटकाचे नाव आहे. अमित हा काचूर्ली परिसरात दुगारवाडी धबधबा येथे काल दुपारी ४ वाजेच्या दरम्यान आला होता. यावेळी अचानक पाणी वाढल्याने तो वाहून गेला. अमित हा धबधब्या जवळ गेला असता अचानक पाणी वाढले. त्यामुळे तो वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. काल पासून शोध मोहीम राबविली जात आहे. मात्र, पावसामुळे अडचणी येत आहे. काल रात्री ७.३० वाजता शोध मोहीम थांबवण्यात आली. दरम्यान, आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Horoscope Today 17 July: मेष, कन्या, धनु, मीन राशीच्या लोकांची फसवणूक होऊ शकते, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

त्र्यंबकेश्वरसह परिसरात पावसाची तूफान बॅटिंग सुरू आहे. पावसामुळे येथील निसर्ग बहरला आहे. यामुळे येथील ओढे नाले आणि नद्या तुडुंब भरून वाहत आहे. अशातच येथील धबधबे देखील कोसळू लागले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. रविवारी देखील मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. यावेळी एकाचा पाय घसरल्याने हा अपघात झाला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पोलिसांनी मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. मात्र, त्या कडे दुर्लक्ष करून नागरिक आपला जीव धोक्यात टाकून वावर करत आहेत.

दरम्यान, काल वर्षा पर्यटनासाठी आलेल्या तब्बल ८ जण वाहून गेल्याची माहिती आहे. मुंबईत देखील महिला वाहून गेली, तर सातारा या ठिकाणी देखील दोन तरुणांचा दरीत कोसळून मृत्यू झाला.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here